ZP Palghar Bharti 2024
परिचय
पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 1891 जागांसाठी भरती सुरु झाली आहे. या भरती साठी अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी उमेदवारा कडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता संदर्भीय शासन पत्रानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत शासनाणे याकरिता स्थानिक पातळीवर शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे इच्छुक उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने नियुक्ती देणेबाबत.
पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक भरती 2024
तपशील | माहिती |
---|---|
जॉब | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वेतन | 20,000 प्रती महिना |
नौकरी स्थान | पालघर |
अर्जाची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 ऑगस्ट 2024 |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज फी | फी नाही |
अधिकृत वेबसाईट | www.zppalghar.gov.in |
अर्ज सादर करण्याचा पत्ता :
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)
इच्छुक उमेदवाराने दि.२३/०८/२०२४ पर्यंत आपले अर्ज शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्रमांक-१७, कोळगाव, पालघर बोईसर रोड, पालघर (प.) या कार्यालयाच्या टपालामध्ये (आवक-जावक) सादर करण्यात यावेत.
२३/०८/२०२४ नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्याच बरोबर कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जामधून जे उमेदवार पात्र ठरतील त्याच उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट प्रसिद्ध करण्यात येईल
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव |
---|---|
01 | प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) |
02 | पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) |
पद संख्या | 1891 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTE
पद क्र.2: D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT
उमेदवारांने खालील अटी व शर्ती चे पालन करावे :
जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी अर्जदारास करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.
उमेदवाने सदरचे बंधपत्र / हमीपत्र रुपये १००/- स्टॅम्पपेपर देण्यात यावे.
अर्जदार उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नाही असे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे
जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली नियुक्ती नियमित पेसा शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल
उमेदवारांनी आपला अर्ज काळजी पूर्वक भरावा त्यासोबत पासपोर्ट साईज फोटोसह तसेच आवश्यक कागदपत्रसह परिपूर्ण अर्ज सादर करावा.
या जाहिराती बद्दल अधिक माहिती खालील दिलेल्या PDF मध्ये मिळेल. अधिक माहिती साठी खालील दिलेली PDF बघा.
महत्वाच्या लिंक
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |