Mahila Bal Vikas Bharti 2024
एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, (नागरी) अमरावती उत्तर भागातील रिक्त असलेल्या नगरपरिषद अचलपुर, दर्यापुर, अंजनगावसुर्जी, धारणी अंगणवाडी मदतनिस (उर्दू भाषिक) पदासाठी नगरपरिषद उत्तर क्षेत्रातील फक्त उर्दू भाषिक स्थानिक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत.
Amravati Anganwadi Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
संस्था | महिला बाल विकास विभाग |
पदाचे नाव | अंगणवाडी मदतनीस (मानधणी सेवा) |
वेतन / मानधन | 5,500 प्रती महिना |
नौकरी स्थान | महाराष्ट्र |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्षे |
अर्जाची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 ऑक्टोबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 सप्टेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | किमान 12 वि उत्तीर्ण (राज्य शिक्षणमंडळ अथवा त्यास समकक्ष) |
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
बालविकास प्रकल्प कार्यालय, (नागरी) अमरावती उत्तर C\o ऍडव्होकेट विलास काळे यांची ईमारत रुखमणी नगर, अमरावती रोड (देवमाळी) परतवाडा तह. अचलपुर जि. अमरावती
वास्तव्याची अट :
उमेदवार हा स्थानिक प्रकल्पाअंतर्गत रहिवाशी असावा (स्थानिक रहीवाशी बाबत शासनाने निश्चीत केलेला पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.)
- गॅस कार्ड / बैंक पासबुक जाहीरातीच्या दिनांकाच्या किमानएक महिना अगोदरचे
- घरटॅक्स पावती (घर भाडयाने असल्यास घरमालकाची अफीडीवीट कॉपी)
- इलेक्ट्रीक बिल
- राशन कार्ड
- आधार कार्ड
यापैकी उपलब्ध पुराव्यानुसार वास्तव्य ठरविण्याचे अधिकार कार्यालयाला राहतील. वास्तव्यासंबंधी वाद उदभवल्यास चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात येईल.
रिक्त जागा असलेल्या क्षेत्रांची नावे :
अक्र | कार्यक्षेत्र | रिक्त पदे |
01 | अचलपुर | 14 |
02 | दर्यापुर | 01 |
03 | अंजनगाव सुर्जी | 09 |
04 | धारणी | 01 |
एकुण | 25 |
पदाचे / कामाचे स्वरुप खालील प्रमाणे
- अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे
- दैनंदीन अंगणवाडी केंद्र उघडणे
- अंगणवाडी स्वच्छता करणे
- पिण्याचे पाणी भरणे निर्देशानुसार कामे पार पाडणे
- लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलावणे
- अंगणवाडी सेविकांचे निर्देशानुसार कामे पार पाडणे
निवड प्रक्रियेविरुध्द तक्रार किंवा अपील
- प्राथमिक गुणानुक्रम यादीती ल कोणत्याही उमेदवाराची वैयक्तीक माहिती खोटी असल्याची अर्ज केलेल्या उमेदवारांची तक्रार असल्यास यादी प्रसिध्द झाल्यापासुन १० दिवसांच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अमरावती उत्तर यांच्या कडे लेखी स्वरुपात तक्रार करावी. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही.
- निवड यादी घोषित झाल्यापासुन ३० दिवसाच्या आत मा. विभागीय उपायुक्त महिला व बालविकास अमरावती विभ ग अमरावती यांचेकडे अपील दाखल करता येईल.
महत्वाची सूचना :
जर उमेदवार हा नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासुन ३० दिवसापर्यंत रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठरविण्यात आले तर प्रतिक्ष यादीतील गुणानुक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल. सदर प्रतिक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासुन १ वर्षा पर्यंत वैध राहील
महत्वाच्या लिंक
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |