Thane Mahanagar Palika Bharti 2024
परिचय
ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील कार्डिअक अॅम्ब्युलन्स करिता ” वैद्यकीय अधिकारी ” व कुष्ठरुग्ण करीता ” लेप्रसी असिस्टंट” या संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने एकत्रित मानधन तत्त्वावर सहा महिन्याच्या (१७९ दिवस) कालावधीकरीता भरणेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. पदासाठी निवड थेट मुलाखतीस (Walk In Interview) असल्यामुळे उमेदवाराने वेळेवर उपस्तित राहावे.
ठाणे महानगरपालिका भरती 2024
तपशील | माहिती |
---|---|
नोकरीचे प्रकार | नोकरीचे प्रकार |
जॉब | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वेतन | 25,000 ते 40,000 प्रती महिना |
नौकरी स्थान | ठाणे |
अर्जाची पद्धत | ऑफलाइन |
वयोमर्यादा | १८ ते ३८ वर्षापर्यंत (राखीव प्रवर्ग 5 वर्ष सूट) |
मुलाखतीची तारीख | 23 ऑगस्ट 2024 |
अनुभव / फ्रेशर | फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात (पदानुसार) |
Gender Eligibility | Male & Female |
निवड प्रक्रिया | मुलाखत / टायपिंग टेस्ट |
अर्ज फी | फी नाही |
अधिकृत वेबसाईट | www.thanecity.gov.in |
अर्ज सादर करण्याचा पत्ता :
के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दि. २३/०८/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk In Interview) उपस्थित रहावे.
वयोमर्यादा :
शासन निर्णय २५ एप्रिल २०१६ च्या नियमानुसार खुल्या प्रवगासाठी वयोमर्यादा कमाल ३८ वर्षे आहे, मागास प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी ५ वर्ष सूट मिळेल त्यामुळे त्यांना वयोमर्यादा ४३ वर्षे आहे.
पदाचे नाव आणि तपशील
पद. क्र. | पदनाम व पद संख्या | दरमहा मानधन |
---|---|---|
01 | वैद्यकीय अधिकारी पदसंख्या – ११ | 40,000/- |
02 | लेप्रसी असिस्टंट पदसंख्या – ०१ | 25,000/- |
प्रवर्गानुसार जागा
क्र. | वैद्यकीय अधिकारी | संख्या |
---|---|---|
01 | अनु. जाती | 02 |
02 | अनु. जमाती | 01 |
03 | भ.ज (ब) | 01 |
04 | इमाव | 02 |
05 | आ.दु.घ. | 01 |
06 | खुला | 04 |
एकूण | 11 |
शैक्षणिक अर्हता व अनुभव
वैद्यकीय अधिकारी
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (M.B.B.S.)
- राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन (Parmanent) असणे आवश्यक.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
लेप्रसी असिस्टंट
- महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (H.S.C)
- शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील लेप्रसी असिस्टंट अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
महत्वाच्या लिंक
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |