Jilha Parishad Vacancy 2024
परिचय
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांकरिता 16 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे, खाली दिलेल्या अटी व शर्ती च्या अधीन राहून उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य भरती 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभाग | जिल्हा परिषद (आरोग्य विभाग) |
जॉब | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वेतन | 15,500 ते 40,000 प्रती महिना |
नौकरी स्थान | रायगड |
अर्जाची पद्धत | ऑफलाइन |
वयोमर्यादा | १८ ते ३८ वर्षापर्यंत (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे) |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 ऑगस्ट 2024 |
अनुभव / फ्रेशर | फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज फी | फी नाही |
अधिकृत वेबसाईट | www.zpraigad.in |
अर्ज साधार करण्याचा पत्ता :
राष्ट्रीय (जिल्हा आरोग्य अधिकारी स्तर), दुसरा कार्यालय मजला आरोग्य जिल्हा अभियान अलिबाग, पिक्चर कोड ४०२२०१
उमेदवाराने अर्ज वेळेवर सादर करावा जर पोस्ट ऑफिस द्वारे अर्ज प्राप्त झाला नाही तर त्याला उमेदवार जबाबदार राहील याची अर्जदाराने नोंद घ्यावी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत आपला अर्ज आरोग्य जिल्हा अभियान अलिबाग मध्ये जमा करावा.
आवश्यक पात्रता :
- विहीत नमुन्यातील अर्ज (सदर अर्जाचा नमुना जाहिराती सोवत संकेत स्थळावर उपलब्ध असेल)
- शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे व गुणपत्रिका (१०वी, १२वी, पदवी, पदव्युत्तर या शैक्षणिक अर्हतेच्या सर्व वर्षे व सर्व सत्रांच्या गुणपत्रिका)
- शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला
- NHM, शासकिय संस्था, विभाग, शासन अंगिकृत संस्थेतील अनुभवाचा दाखला तसेच COVID अंतर्गत शासकिय आरोग्य संस्थेतील विहित पदासाठी काम केलेल्या अनुभवाचा दाखला असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच विनावेतन, अर्धवेळ, प्रशिक्षण कालावधी, अॅड-हॉक (Ad-hoc), अंतरवासिता (Internship) चा अनुभव ग्राहय धरला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
- संबंधित पदाकरिता तत्सम कौन्सिलचे महाराष्ट्र राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र (पर्मनंट), नोंदणीचे नुतनीकरण व कौन्सिलचे आयकार्ड
- पासपोर्ट आकाराचे २ फोटो
- उमेदवाराच्या नावांत बदल झाला असल्यास शासनाचे राजपत्र
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
गुणांकन पध्दतीनुसार निवड प्रक्रिया :
विवरण | विवरण | अधिकतम गुण |
पदासाठी आवश्यक Qualifying exam मधील गुण (अंतिम वर्षाच्या आधारे) | मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे ५० प्रमाणे proportion काढावे. (उदा. ६०% गुण प्राप्त असल्यास त्याचे ५०% प्रमाणे proportion ६००५०/१००-३०) | 50 गुण |
पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास (संबंधित विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अर्हता | अधिकतम २० गुण द्यावेत मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे २० प्रमाणे proportion काढावे. (उदा. १. Staff Nurse पदाची आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करून अतिरिक्त B.Sc (Nursing) हि शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या उमेदवाराने अर्ज केला असल्यास उमेदवारास M.Sc (Nursing) च्या अंतिम वर्षात ६०% गुण प्राप्त असल्यास त्याचे २०% प्रमाणे proportion = ६००२० /१०० = १२ गुण) | 20 गुण |
संबंधित पदाशी निगडीत अनुभव | प्रत्येक १ वर्षासाठी ६ गुण द्यावेत. (१ वर्षाकरिता ६ गुण, जास्तीत जास्त ३० गुण) | 30 गुण |
महत्वाच्या लिंक
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |