Jilha Parishad Shikshan Vibhag Bharti 2024
परिचय
सदर शासन पत्रातील निर्देशाचे अनुषंगाने विविध टप्प्यानुसार केलेल्या कार्यवाही अंती प्राप्त आवेदन पत्राचे आधारे नियुक्तीची कार्यवाही करण्याचे अधीन राहून उर्वरित शिल्लक रिक्त पदाकरीता अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांकडून पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदावर अगदी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून याद्वारे आवेदन पत्र मागविण्यात येत आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अटी व शर्ती तसेच इतर आवश्यक दस्ताऐवजासंबधी सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
जिल्हा परिषद शिक्षक विभाग भरती गडचिरोली 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभाग | जिल्हा परिषद |
जॉब | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वेतन | ₹20,000 प्रती महिना |
नौकरी स्थान | गडचिरोली |
वयोमर्यादा | किमान 18-21 वर्षे, कमाल 40 वर्षे |
अर्जाची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 ऑगस्ट 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.zpgadchiroli.in/ |
अर्ज साधार करण्याचा पत्ता :
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली..
पदासाठी किमान शैक्षणिक/व्यावसायिक अर्हता :
- इ. 1 ते 5 करीता :- HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1 उत्तीर्ण, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-2022 (TAIT) उत्तीर्ण.
- इ. 6 ते 8 करीता : पदवी, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH OR B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET /CTET पेपर – 2 उत्तीर्ण, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी- 2022 (TAIT) उत्तीर्ण.
Note : शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) उत्तीर्ण उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास अट शिथील करण्याचा विचार करण्यात येईल.
वयोमर्यादा :
उमेदवाराचे वय जाहिराती मध्ये दिलेल्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय 18 वर्षापेक्षा कमीव 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय / दिव्यांग उमेदवारानां सूट मिळेल, त्यांना कमाल वयोमर्यादा 45 वर्ष राहील).
अर्ज कसा करावा :
उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करावयाचा आहे. अलीकडे काढलेला व स्वतःचा स्वाक्षरी केलेला फोटो लावावा. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक त्या सर्व शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेचा प्रमाणपत्राच्या सुस्पष्ट दिसतील अशा व स्वसांक्षाकीत प्रती जोडाव्यात. (कागद पात्र जोडणे अनिवार्य आहे)
- SSC/HSC, गुणपत्रक व प्रमाणपत्र
- पदवी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र
- D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH/B.Ed. गुणपत्रक व प्रमाणपत्र.
- TET / CTET पेपर 1 उत्तीर्ण , शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-2022 (TAIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र.
- TET / CTET पेपर 2 उत्तीर्ण (Qualified), शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-2022 (TAIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- स्थानिक अनुसुचित जमातीचा उमेदवार असल्यास पेसा क्षेत्रातील रहिवास प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
निवड व कार्यपध्दती खालील प्रमाणे दिली :
जाहिरातीव्दारे प्राप्त होणारे अर्जानुसार अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT)’ मधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व या गुणवत्ता यादीतील रिक्त जागांच्या प्रमाणात उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येईल.
महत्वाच्या लिंक
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
टीप: पोस्टाचे विलंबास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. याशिवाय उमेदवाराने स्वतः पुर्ण भरलेले अर्ज शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली (दुसरा माळा) यांचे कार्यालयात दिनांक 27/08/2024 पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.15 पर्यंत स्विकारण्यात येतील.