Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबविण्यास उक्त संदर्भाधीन दि. ९ जुलै, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहचविण्यासाठी ५०,००० योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री योजनादूत भारती 2024
तपशील | माहिती |
---|---|
संस्था | महाराष्ट्र शासन |
योजना नाव | मुख्यमंत्री योजनादूत |
एकूण रिक्त जागा | 50,000 |
नौकरी स्थान | संपूर्ण महाराष्ट्र |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर |
वयोमर्यादा | किमान 18-21 वर्षे, कमाल 35 वर्षे |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | ऑक्टोबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | —— |
अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट |
मुख्यमंत्री योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे :
- सरकारच्या अधिकृत वेबसाइट वर “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज
- आधारकार्ड (ओळख पत्र )
- ज्या क्षेत्रामध्ये अर्ज करणार त्या मधील पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र
- अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला)
- स्वताचे बँक खात्याचा तपशिल.
- पासपोर्ट साईज फोटो.
- हमीपत्र. (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)
मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी दिलेल्या अटी :-
1.उमेदवारांचे वयोमर्यादा १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावी.
2. अर्ज पात्र होण्यासाठी कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर
3. संगणक ज्ञान आवश्यक आहे.
4. उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक आहे.
5. अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
6. उमेदवाराकडे आधार कार्ड असावे.
7. आधार कार्ड सोबत त्याच्या नावाचे बँक खाते लिक असावे.
कार्यक्रमाची ठळक रुपरेषा खालील प्रमाणे दिली आहे :
- महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील.
- ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात ५००० हजार लोकसंख्येसाठी १ योजनादूत या प्रमाणात एकूण ५० हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल.
- मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी १०,००० प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित)
- निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत ६ महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.
महत्वाची सूचना :
मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब, या नेमणूकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात यावे. त्याच बरोबर प्रत्येक उमेदवाराबरोबर ६ महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही.
महत्वाच्या लिंक
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
👉 ऑनलाईन अर्ज करा | ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |