BMC Permanent Vacancy 2024 : मुंबई महानगरपालिका विभागा मार्फत निरीक्षक या पदाकरिता 178 पदासाठी भरती निघालेली आहे त्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे उमेदवारांना दिनांक 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज खालील नमूद केलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करावा या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
BMC Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | बृहन्मुंबई महानगरपालिका |
कॅटेगरी | मनपा सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 36 वर्षे |
नौकरी स्थान | मुंबई |
वेतन | 29,200/- ते 92,300/- |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 20 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 29 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | प्रवर्गानुसार |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.mcgm.gov.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) निरीक्षक | 178 |
एकूण | 178 |
● शैक्षणिक पात्रता :
- पदवीधर: उमेदवाराने कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.
- मराठी भाषा: उमेदवाराने मराठी विषयात किमान 100 गुणांसह एसएससी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी (मुख्य किंवा दुय्यम विषय म्हणून).
- संगणक ज्ञान: उमेदवाराकडे DOEACC Society कडून CCC, ‘O’, ‘A’, ‘B’, किंवा ‘C’ स्तराचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून MSCIT/GEICT प्रमाणपत्र असावे.
- टायपिंग कौशल्य: उमेदवाराकडे मराठी आणि इंग्रजी टायपिंगसाठी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे प्रमाणपत्र असावे.
● वयोमर्यादा :
Mumbai Mahanagarpalika Bharti मधील निरीक्षक या पदाकरिता उमेदवाराची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष असणे आवश्यक आहे या पदाकरिता मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष सूट मिळेल.
● आवश्यक कागदपत्रे :
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्मदाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रके व प्रमाणपत्रे
- मराठी व इंग्रजी भाषेचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र आवश्यक वेगासह
- संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र (MSCIT किंवा समतुल्य)
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
● वेतन :
InfoM-17 अंतर्गत निरीक्षक पदासाठी उमेदवारांना मिळणारा मोबदला म्हणून ₹29,200 ते ₹92,300 पर्यंत वेतन मिळणार.
● अर्ज कसा करावा : (BMC Inspector Recruitment 2024)
मुंबई महानगरपालिकेमध्ये निरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा फी म्हणून प्रवर्गाच्या आधारावर द्यावी लागेल जो Gen/OBC/EWS उमेदवार या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 1,000/- रुपये फी द्यावी लागेल आणि जो SC/ST/PwD उमेदवार या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 900 रुपये फी द्यावी लागेल.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
मुंबई महानगरपालिका मध्ये निरीक्षक पदासाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी महाराष्ट्र मधील उमेदवार अर्ज करू शकतात. परीक्षा शुल्क उमेदवाराच्या प्रवर्गाअनुसार घेण्यात येत आहे, उमेदवार पात्र झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण उमेदवारांना मुंबई मिळणार आहे. निवड प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षा मार्फत होणार आहे. हा एक पर्मनंट जॉब आहे अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नक्की करा.