ITBP Constable Driver Recruitment 2024 भारत-तिबेट सीमा पोलीस दल विभाग मध्ये 545 पदाकरिता कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी भरती निघालेली आहे. हा एक केंद्र सरकार जॉब आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन प्रकारे राहणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी दिनांक 06 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपला अर्ज आयटीबीपी च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करावे सोबतच या भरती बद्दल शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन आणि निवडणूक प्रक्रिया याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
ITBP Constable Driver Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 21 ते 27 वर्षे |
नौकरी स्थान | ऑल इंडिया |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 08 ऑक्टोबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 नोव्हेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | प्रवर्गानुसार |
कोण अर्ज करू शकतात | भारतीय नागरिक |
अधिकृत वेबसाईट | www.itbpolice.nic.in |
MGM KVK Chhatrapati Sambhajinagar Bharti 2024 | महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्र भरती २०२४
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) | 545 |
एकूण | 545 |
● शैक्षणिक पात्रता :
- कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदाकरिता उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्ड विद्यापीठ मधून किंवा संस्थेमधून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा सक्षम असावे.
- ड्रायव्हिंग पदासाठी भरती असल्यामुळे उमेदवाराकडे वैध अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
या पदासाठी उमेदवाराचे किमान वयोमर्यादा 21 वर्ष असावे आणि कमाल वयोमर्यादा 27 वर्ष असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे उमेदवार SC आणि ST या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 5 वर्ष सूट मिळेल आणि जे उमेदवार OBC प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 3 वर्ष सूट मिळेल. याबद्दल सविस्तर माहिती खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये आहे.
● वेतन :
जाहिरातीनुसार कॉन्स्टेबल या पदासाठी तीन थरामध्ये पगार देण्यात येईल सातवा वेतन आयोगानुसार या पदाकरिता पगार रु. 21,700 ते रु. 69,100/- दरम्यान असतो. जेव्हा उमेदवाराची निवड झाल्यानंतर उमेदवाराला भारतात किंवा परदेशात कुठेही सेवा करण्यासाठी तयार राहावे लागेल.
● निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रिया मध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), लेखी परीक्षा, मूळ दस्तऐवज पडताळणी, कौशल्य चाचणी आणि वैद्यकीय तपासणी (DME/RME) यांचा समावेश असेल.
● परीक्षा शुल्क :
Gen/OBC/EWS या प्रवर्गातील उमेदवारांना ड्रायव्हर या पदा परीक्षा शुल्क 100 रुपये राहणार आहे आणि जे उमेदवार SC/ST/PwD प्रवर्गामध्ये आहेत अशांना कोणत्याच प्रकारची परीक्षा शुल्क नाही.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) मध्ये केवळ दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी भरती निघालेली आहे. अर्ज हा ऑनलाइन प्रकारे भरण्याचा आहे. पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या (ITBP) च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज पूर्ण करावा. अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या महाजोग संधीवाच्या ग्रुप ला जॉईन करा.