[10th Pass] Eastern Railway Bharti 2024 पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती, लगेच बघा अंतिम तारीख!
by
Eastern Railway Bharti 2024 पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटिस साठी मेगा भरती निघालेली आहे, या पदाकरिता महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. अर्ज हा ऑनलाइन राहणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दिनांक 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज पूर्व रेल्वे अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करावा. या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा त्यासमकक्ष (10+2 परीक्षा प्रणालीअंतर्गत) परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
उमेदवाराकडे NCVT/SCVT ने जारी केलेला अधिसूचित व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
ITI (Fitter/Welder/ Mechanic (MV)/Mechanic (Diesel)/Carpenter/Painter/Lineman/Wireman/Ref.& AC Mechanic/ Electrician/MMTM)
● वयोमर्यादा :
दिनांक 23 ऑक्टोंबर 2024 रोजी उमेदवाराची किमान वयोमर्यादा 15 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 24 वर्ष असावे. जो उमेदवार SC आणि ST या प्रवर्गामध्ये आहे अशा उमेदवाराला या पदाकरिता 05 वर्षे सूट मिळेल आणि जो उमेदवार OBC प्रवर्गामध्ये आहे अशा उमेदवाराला 03 वर्षे सूट मिळेल.
● आवश्यक कागदपत्रे :
स्कॅन केलेला छायाचित्र
स्कॅन केलेली स्वाक्षरी
इयत्ता 10वी गुणपत्रक
एनसीव्हीटी/एससीव्हीटी कडून आयटीआय प्रमाणपत्र
समुदाय प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS)
PwBD प्रमाणपत्र
● अर्ज कसा करावा :
अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता निकष पूर्ण आहेत याची खात्री करावी; अपात्र असल्यास नियुक्ती रद्द होईल.
शुल्क सवलत, आरक्षणासाठी आवश्यक दस्तऐवज पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक.
RRC/ER कोलकाता वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करा व सूचनांचे पालन करा.
अर्जातील माहिती मॅट्रिक प्रमाणपत्राशी जुळवून भरा.
SC/ST/OBC/EWS साठी प्रमाणपत्रानुसार माहिती भरा.
पूर्व रेल्वेच्या एका युनिटमध्येच प्रशिक्षण मिळेल.
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी निवडीच्या प्रक्रियेपर्यंत सक्रिय ठेवा.
Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वेमध्ये 3115 जागेसाठी भरती निघालेली आहे, यासाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी आपला अर्ज वेळेवर भरून पूर्ण करावा अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या चुका करू नये अन्यथा आपला अर्ज नाकारण्यात येईल. अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी महा जॉब संधी वाटसप ग्रुप ला जॉईन करा.