Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 विधी व न्याय विभाग मार्फत गट क मधील वाहक चालक या पदासाठी त्यासाठी दहावी पास असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. महिला व पुरुष दोघेही या पदासाठी पात्र आहे, अर्ज ऑफलाइन पद्धतीने असल्यामुळे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आपला अर्ज दिनांक 20 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करावं. या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
Vidhi Nyay Vibhag Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | विधी व न्याय विभाग |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
वेतन | 19,900/- ते 63,200/- प्रति महिना |
नौकरी स्थान | मुंबई |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 11 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | पुरुष आणि महिला |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.lj.maharashtra.gov.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) वाहन चालक (गट क) | 2 |
एकूण | 2 |
● शैक्षणिक पात्रता :
गट क मधील वाहक चालक या पदासाठी उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
विधी व न्याय विभाग मार्फत वाहक चालक या पदासाठी उमेदवाराचे किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्षे असणे आवश्यक आहे. 1 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत वय मोजण्यात येईल
● आवश्यक कागदपत्रे :
अर्ज ऑफलाईन असल्याकारणामुळे उमेदवारांनी खाली नमूद केलेले सर्व कागदपत्र आपल्या अर्जाला जोडून पाठवावे.
- वयाचा दाखला
- शासन मान्यता प्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
- हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्यासाठी परवाना
- अनुभव प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
पत्ता : “उप सचिव (प्रशासन), ३ रा मजला, विस्तार इमारत, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२”
ज्या उमेदवारांना या पदांकरिता अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज योग्य वेळेवर पूर्ण करावा वेळेस विलंब झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
● वेतन :
या पदासाठी उमेदवाराला 19,900/- ते 63,200/- रुपये प्रति महिना या प्रकारे वेतन मिळेल.
● निवड प्रक्रिया :
चालक साठी निवड प्रक्रिया ही दोन श्रेणीमध्ये विभाजनात आली आहे सर्वप्रथम उमेदवाराची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवार या परीक्षेमध्ये पात्र झाल्यानंतर मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल नंतर उत्तम गुण मिळाल्यानंतर उमेदवार या पदासाठी पात्र ठरेल.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
विधी विभाग मार्फत वाहक चालक या पदाकरिता भरती निघालेली आहे. परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आणि निवड झाल्यानंतर उमेदवाराला नोकरीचे ठिकाण मुंबई देण्यात येईल. या पदासाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज वेळेवर पूर्ण करावा. अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी महा जॉब संधी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करावा.